रहिमपूर विद्यालयात इयत्ता १२ वी निरोप समारंभ उत्साहात संपन्न
*विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कठोर मेहनत घ्यावी ….प्रा.नवनाथ डोंगरे* 🏆
………….*रहिमपूर विद्यालयात इयत्ता १२ वी निरोप समारंभ उत्साहात संपन्न*
भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रहिमपूर येथे १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला .
*विद्यालयाचे प्राचार्य श्री के के जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी कला व विज्ञान विभागाचा *निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. निरोप समारंभ रहिमपूर जूनियर कॉलेजचे इंचार्ज तथा विभागप्रमुख श्री गोरक्षनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रसंगी प्रा.राजू जगताप, प्रा नवनाथ डोंगरे, प्रा. भास्कर राठोड तसेच
शिक्षक प्रतिनिधी सौ मुसमाडे यांनी विद्यार्थ्याना विविध दाखले देत अभ्यासाचे महत्व पटवून दिले.प्रसंगी ,सुनील शिंदे ,सुनील कुळधरण अनिस शेख ,श्रीमती दिपाली वायकर आदी शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा डोंगरे सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच यशासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रा शिंदे जी एस सर यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास कसा करावा याचा गुरुमंत्र दिला. दरम्यान विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.सायली साबळे तसेच कु श्रद्धा दातीर,कु नूतन अंत्रे, निकिता साबळे आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिका शिंदे ,परास्ताविक तनिका हिने केले व आभार ईश्वरी दिघे हिने मानले.
Comments
Post a Comment