*तळेगांव दिघे प्राथमिक शाळेत प्रथमच ३३ वर्षानंतर भरली शाळा*

 *तळेगांव दिघे प्राथमिक शाळेत प्रथमच ३३ वर्षानंतर भरली शाळा*




वर्ष १९९२ च्या इयत्ता ४ थी च्या माजी विद्यार्थ्यांनी केले आपल्या गुरूवर्याचे अभूतपूर्व स्वागत ……

*तीच शाळा ……*

*तेच शिक्षक……*

*तेच विद्यार्थी …..*

*आणि त्याच आठवणी…..*



रविवार दिनांक -१६ /०२/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आदरणीय गुरुवर्य मोकळ गुरुजी (वय ७५वर्ष),गायकवाड गुरुजी (वय ८१वर्ष) ,वामन गुरुजी(७० वर्ष) ,वाघ गुरुजी (७२ वर्ष),म्हसेबाई(५७ वर्ष),तावडे बाई(५८ वर्ष),सोनवणे बाई (६५ वर्ष) आदि गुरूवर्यांच्या उपस्थितीत स्नेह मेळावा पार पडला …. अचानक ३३ वर्षानंतर भेटलेल्या मित्र परिवार काहीसे बदललेले चेहरे ….आपले शिक्षक ,भूतकाळातील आठवणींचा पुन्हा उजाळा देणारे हे स्नेहसंमेलन एक आदर्श  ठरले…. आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवन पाहून भाराऊन गेलेले गुरुजनांचे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता…




माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार केले त्यानंतर सरस्वती मातेचे दीपप्रज्वलण करून….सामूहिक राष्ट्रगीताद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे श्री गायकवाड गुरुजींनी आपला वर्ग भरवला . भरलेल्या ४ थी च्या वर्गात सचिन भुतकर प्रल्हाद दिघे, अविनाश मोकळ ,आरिफ शेख ,हिमायत शेख ,रामदास दिघे ,राजेंद्र दिघे ,राजू दिघे, रमेश दिघे ,सलीम सय्यद ,चांगदेव कांदळकर ,रवी दिघे ,विठ्ठल लामखडे ,सोमनाथ जगताप ,नामदेव पिंगळे ,प्रकाश जगताप ,मन्सूर सय्यद ,रमेश दिघे ,प्रसाद दिघे ,रामदास दिघे ,सुलोचना दिघे ,रंजना दिघे ,जनाबाई दातीर ,संगीता कांदळकर, शाहीन शेख आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . गुरुजींनी वाक्प्रचार, म्हणी, सुविचार विद्यार्थ्यांना शिकवले.प्रसंगी काही विद्यार्थ्यांना छडी देऊन शिक्षा केली व जुन्या आठवणीं ताज्या झाल्या…… कार्यक्रमानंतर स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन भुतकर यांनी केले तसेच प्रल्हाद दिघे यांनी आभार मानले.











Comments

Popular posts from this blog

Quiz National SCIENCE Day Competition for All

Chemistry Important Questions Board Exam 2025

महिलांमुळेचं समाजाचे व राष्ट्राचे* बळकटीकरण* ……प्राचार्य जाधव*