BBA /BCA /MBA -MH CET 2025 Last Date

 

MH CET 2025 : 'या' अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख वाढली……




उमेदवार आता अधिकृत वेबसाइटला https://cetcell.mahacet.org/ भेट देऊन २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी, नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० मार्च होती. 

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MH CET 2025) सेलने विविध अभ्यासक्रमासाठी एमएएच सीईटी २०२५ साठी नोंदणीची अंतिम (Registration Date) तारीख वाढवली आहे. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटला https://cetcell.mahacet.org/ भेट देऊन २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी, नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० मार्च होती.

एकात्मिक मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA), मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (MCA), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (BCA), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (BBM) आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (MH CET) २०२५ साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.  

‘या’ परीक्षेसाठी असा करा अर्ज 

  * https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

* त्यानंतर MAH CET 2025 नोंदणी लिंकवर क्लिक करा.

*नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स जनरेट करा. *

पोर्टलने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आवश्यक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.

* फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रत डाउनलोड करा.

लॉजिकल रिझनिंग, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि व्हर्बल एबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेंशन अशी चार विभागांमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.  


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Quiz National SCIENCE Day Competition for All

Chemistry Important Questions Board Exam 2025

महिलांमुळेचं समाजाचे व राष्ट्राचे* बळकटीकरण* ……प्राचार्य जाधव*