रहिमपूर विद्यालयात हिंदुस्थान फीड्स तर्फे विद्यार्थ्यांना वाह्यांचे वाटप ….
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इतिहास घडविण्याची ताकत * …..रविंद्र पवार
हिंदुस्थान फीड्स तर्फे विद्यार्थ्यांना वाह्यांचे वाटप ….
भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय* रहीमपूर येथे आज १५ मार्च रोजी पशुखाद्यातील नामांकित अग्रेसर असलेली कंपनी *हिंदुस्थान फीडस* मार्फत विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याने हिंदुस्थान फीड्स चे मार्केटिंग ऑफिसर श्री रविंद्र पवार म्हणाले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीच नेहमी अग्रेसर असतात.हिंदुस्थान फीडस चे नाते ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाशी जोडलेले असून शेतकऱ्यांच्या मुलांची प्रगती झाली पाहिजे त्यासाठी हातभार म्हणून हिंदुस्थान फीडस दरवर्षी सुमारे १२ ते १५ लाख वाह्यांचे वाटप करते संगमनेर तालुक्यात ६० ते ७० हजार विद्यार्थ्यांना बाह्यांचे वाटप होते असे त्यावेळी पवार म्हणाले.
प्रसंगी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक श्री नानासाहेब दौलतपाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाऊसाहेब गीताराम शिंदे संचालक सहकार्महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना , श्री आबासाहेब शिंदे (पोलीस पाटील),शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाजीराव शिंदे, उपाध्यक्ष श्री संदीप शिंदे , श्री दत्तात्रय खुळे,श्री जयराम वाळुंज ,श्री इंद्रभान शिंदे ,अण्णासाहेब शिंदे ,श्री सतीश शिंदे,श्री तुकाराम शिंदे.काकड पाटील , आदि मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्याना वह्या मिळण्यासाठी त्रिमूर्ती उद्योग समूहाचे संचालक श्री सुनील माधव शिंदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री के के जाधव सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा नवनाथ डोंगरे सर व प्रा राजू जगताप सर यांनी केले तसेच आभार श्री भाऊसाहेब थोरात सर यांनी मानले .
इतर क्षणचित्रे:-
Comments
Post a Comment