इयत्ता ५ वी व ८ वीतील विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद
यापुढे इयत्ता ५ वी व ८ वी विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद …..
केंद्र सरकारने इयत्ता ५वी आणि ८वी मधील 'नो डिटेंशन पॉलिसी' (No Detention Policy) रद्द केली आहे, याचा अर्थ आता या वर्गातील विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण होणार नाहीत. नापास झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, पण त्यातही नापास झाल्यास त्यांना पुढील वर्गात जाण्याची परवानगी मिळणार नाही.
अधिक माहिती:
- आता, ५वी आणि ८वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळेल. या परीक्षेतही ते नापास झाल्यास, त्यांना त्याच वर्गात ठेवले जाईल.इयत्ता ५ वीउत्तीर्ण होण्यासाठी इयत्ता ५ वी तील विद्यार्थ्याला प्रत्येकविषयात ४०पैकी १८ गुण मिळविणे अनिवार्य असणारआहे तसेच १० गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठीअसे एकूण ५० गुण असतील.इयत्ता ८ वीउत्तीर्ण होण्यासाठी इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात५० पैकी २१ गुण मिळविणे अनिवार्य असणार आहे तसेच १० गुणहे अंतर्गत मूल्यमापनासाठी असे अजून ६० गुण असतील.
- या निर्णयामागे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि त्यांना योग्य वेळी मदत करणे हे प्रमुख कारण आहे.
- हे धोरण केंद्र सरकारच्या शाळांना (Central Schools) लागू आहेत तसेच….. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रत्येक शाळेला किमान २० वर्षेसंग्रही ठेवाव्या लागणार आहेत.
- या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची आणि चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळेल, तसेच शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढेल.📌अधिक माहितीसाठी 👇
https://m.youtube.com/watch?si=7JJm-rQhedEZluLc&v=x58bepHIs9c&feature=youtu.be
Comments
Post a Comment