TAIT Exam -2025 अभियोग्यता चाचणी परीक्षा २०२५
🎯IBPS Third TAIT 2025 अभियोग्यता चाचणी परीक्षा २०२५

*📌 शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली, तिसरी TAIT परीक्षा 24 मे 2025 पासून ऑनलाइन होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, IBPS परीक्षा पद्धती व संदर्भ*

✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.
✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे.
🎯 TAIT परीक्षा जाहिरात लिंक - 👇
https://www.mscepune.in
*🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -👇
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25
*#शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 वेळापत्रक#*
1.परीक्षा अर्ज भरणे - 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025
2. ऑनलाइन परीक्षा - 24 मे 2025 ते 5 जून 2025
3.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे- परीक्षेच्या 7 दिवस अगोदर
*TAIT 2025 परीक्षा शुल्क*
1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये
2.मागासवर्गीय/EWS/SEBC/ अनाथ / दिव्यांग - 850 रुपये
✅ या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली ते आठवी मधील इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी डी.एड + टीईटी पेपर एक आणि 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+ टीईटी पेपर दोन असलेले शिक्षक पाञ आहेत.
✅तर 9 वी व 10 वी वर्गासाठी बी.एड. असलेले शिक्षक पात्र आहेत. आणि 11वी व 12 वी वर्गासाठी एम.ए./एम.एस्सी./एम.कॉम. आणि बी.एड. असणारे शिक्षक पात्र आहेत.
9 ते 12 या वर्गासाठी अर्ज करण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची आवश्यकता नाही.
*✅प्रस्तुत परीक्षा ऑनलाइन होणार असून 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.*
🎯सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.
*🎯TAIT 2025 अभ्यासक्रम*
TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.
*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*
*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*
*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.
*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*
*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)
*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)
*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे
*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे
*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.
*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)
★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
*परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा*
*🌹Best of luck🌹*
*#प्रत्येक D.Ed., B.Ed, M. Ed, TET व CTET उत्तीर्ण असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदर माहिती शेअर करावी ही विनंती#*
Comments
Post a Comment