Posts

Showing posts from May, 2025

उद्या १३ मे रोजी जाहीर होणार इयत्ता दहावी चा निकाल

प्रतीक्षा संपली 👆 उद्या १३ मे रोजी जाहीर होणार इयत्ता दहावी चा निकाल ….९ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल   SSC Result 2025-मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे घेतल्या गेलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 01 वाजल्यापासून प्रकाशित होणार आहे. हा निकाल तुम्हाला शासनाद्वारे प्रकाशित केलेल्या विविध वेबसाईटवर पाहता येणार आहे कारण ऑनलाईन पद्धतीनेच निकाल प्रकाशित होणार आहे अथवा केला जाणार आहे. आता ह्या वेबसाईट कोणत्या आहेत त्यासोबतच निकाल कसा पाहायचा याबद्दलची माहिती आपण खाली पाहूया. मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी हा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजल्यापासून पाहू शकणार आहात यासाठी मंडळाद्वारे विविध वेबसाईट सांगण्यात आले आहेत ज्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि  आईचे नाव /इतर माहिती टाकून तुमचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहात आणि त्यासोबत त्याची प्रिंट देखील काढू शकणार आहात. मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी हा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजल्यापासून पाहू शकणार आहात ...

राष्ट्राच्या तसेच समाजाच्या जडणघडणीत कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ….प्राचार्य जाधव

Image
  राष्ट्राच्या तसेच समाजाच्या जडणघडणीत कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ….प्राचार्य कैलास जाधव  भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रहीमपूर येथे आज १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इयत्ता ५ वी ते ११ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीद्वारे महाराष्ट्रदिनाचे महत्व जनतेला पटवून दिले. तसेच  प्राचार्य श्री के के जाधव यांच्या हस्ते विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला . समाजाच्या तसेच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जात आहे असे प्राचार्य जाधव म्हणाले. प्रसंगी   स ब वि प्र समाज संस्थेचे संचालक नानासाहेब दौलत पाटील शिंदे  यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये रंगोत्सव राष्ट्रीय स्पर्धेत तसेच ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्णपदके पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदके प्रदान करून गौरवण्यात आले … इतर छायाचित्रे: