वृक्षसंवर्धन ही काळाची गरज …प्राचार्य जाधव पर्यावरण संवर्धनासाठी रहिमपुर विद्यालयात “एक पेड मां के नाम “ उपक्रम

१२ जून २०२५

*वृक्षसंवर्धन ही काळाची गरज …प्राचार्य जाधव*

*पर्यावरण संवर्धनासाठी रहिमपुर विद्यालयात “एक पेड मां के नाम “ उपक्रम*

जागतिक पर्यावरण दिननिमिताने संपूर्ण भारतभर राबविण्यात येणारा एक पेड मां के नाम अभियान आज

भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रहीमपूर येथे देखील राबविण्यात आला .पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड मां के नाम या अभियाना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांमार्फत विद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आलीव त्या वृक्षास आपल्या आईचे नाव देण्यात आले. विद्यार्थ्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपण लागवड केलेल्या वृक्षाची काळजी तसेच संगोपन करण्याचे आश्वासन दिले. रहिमपूर विद्यालयाचे प्राचार्य कैलास जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम यशस्वी रित्या विद्यालय परिसरात राबविण्यात आला. प्रसंगी वृक्षांची लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी व कर्तव्य आहे …भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार वृक्षांची संख्या वाढणे आवश्यक आहे अन्यथा पर्यावरणाचा समतोल राखणे कठीण होईल असे मत प्राचार्य जाधव यांनी मांडले.प्रसंगी स ब वि प्र समाज संस्थेचे संचालक नानासाहेब दौलतपाटील शिंदे,स्थानिक स्कूल कमिटीचे संचालक श्री दत्तात्रय खुळे उपस्थित होते .दरम्यान जूनियर कॉलेजचे इंचार्ज प्रा गोरक्षनाथ शिंदे ,प्रा नवनाथ डोंगरे ,प्रा राजू जगताप,प्रा सुनील शिंदे , प्रा भास्कर राठोड,सहशिक्षक राजेंद्र सुपेकर , प्रकाश खुळे , अमोल जोंधळे, जालिंदर खेमनार, भाऊसाहेब थोरात , सतीश भोसले आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog

Quiz National SCIENCE Day Competition for All

Chemistry Important Questions Board Exam 2025

महिलांमुळेचं समाजाचे व राष्ट्राचे* बळकटीकरण* ……प्राचार्य जाधव*