भिमाजी शिंदे यांचे मोलाचे योगदान …..प्राचार्य जाधव
*रहिमपूर विद्यालयाच्या जडणघडणीत भिमाजी शिंदे यांचे मोलाचे योगदान …..प्राचार्य जाधव*
२८-जुलै २०२५ :
भिमाजी आंबूजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माघ्यमिक विद्यालयात दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय कैलासवासी भिमाजी आंबुजी शिंदे यांना त्यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक मान्यवरांनी स्तुतीसुमने उधळली तसेच गौरव उद्गार काढले..ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावा, त्याने उच्च शिक्षण घ्यावे या उद्देशाने आदरणीय कै. भिमाजी आंबूजी शिंदे यांनी आपली सुमारे 54 गुंठे जागा ही विद्यालयासाठी दान केली. असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष तसेच भीमाजी शिंदे यांचे नातू संदीप शिंदे यांनी केले .प्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी त्यांची धारणा होती व त्यांनी या पवित्र कामासाठी प्रथम पाऊल उचलले होते,असे प्रतिपादन रहीमपुर विद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास जाधव सर यांनी केले.आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे पवित्र असे काम या विद्यालयाच्या माध्यमातुन घडले यांचे सर्व श्रेय जाते ते फक्त कै.भिमाजी आंबूजी शिंदे यांना …असे गौरवोद्गार सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक श्री नानासाहेब दौलत पाटील शिंदे यांनी काढले. विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या दानशुर व्यक्तिमत्त्वाला विद्यालयातर्फे आज पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आले.
दरम्यान श्री दत्तात्रय खुळे, श्री आणासाहेब शिंदे ,श्री रामनाथ शिंदे ,आदि मान्यवरांची भाषणे झाली.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक श्री नानासाहेब दौलत पाटील शिंदे ,अमृतवाहिनी बँकेचे संचालक बाबासाहेब शिंदे,सोसायटीचे व्हाईस चेअरमन अण्णासाहेब शिंदे,सामाजिक कार्यकर्ते , रामनाथ शिंदे , दत्तात्रय खुळे,,आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पन करण्यातआले .कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली.
याप्रसंगी भाऊसाहेब थोरात ,प्रकाश खुळे,अमोल जोंधळे,जालिंदर खेमनर ,सुरेखा कांबळे ,पल्लवी वैद्य,वंदना देशमुख,शारदा वायाळ,ज्यु कॉलेजचे इंचार्ज
गोरक्षनाथ शिंदे ,राजू जगताप ,सुनील शिंदे ,सुनील कुळधरण ,नवनाथ डोंगरे ,अनिस शेख ,आसराबाई मुसमाडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजू जगताप सर यांनी केले तसेच राजेंद्र सुपेकर आभार यांनी मानले.
Comments
Post a Comment