महिलांमुळेचं समाजाचे व राष्ट्राचे बळकटीकरण ……प्राचार्य जाधव भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रहीमपूर येथे आज ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. अमृतवाहिनी बँकेचे संचालक श्री अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रामभाऊ कारभारी शिंदे ,नानासाहेब दौलत पाटील शिंदे,श्री दत्तात्रय पाटील खुळे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री के के जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त आज विद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका श्रीमती आसराबाई मूसमाडे ,श्रीमती दिपाली वायकर , सहशिक्षिका श्रीमती पल्लवी वैद्य , श्रीमती सरिता भोर, श्रीमती वंदना देशमुख, श्रीमती शारदा वायाळ, श्रीमती सुरेखा कांबळे तसेच महिला कर्मचारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. तसेच एकवीरा फाउंडेशन आयोजित भव्य रस्सीखेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इयत्ता ११ वी कला या वर्षातील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.दरम्यान विद्यालयातील महिला शिक्षिकांसाठी संगीत खुर...