भिमाजी शिंदे यांचे मोलाचे योगदान …..प्राचार्य जाधव
* रहिमपूर विद्यालयाच्या जडणघडणीत भिमाजी शिंदे यांचे मोलाचे योगदान …..प्राचार्य जाधव* २८-जुलै २०२५ : भिमाजी आंबूजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माघ्यमिक विद्यालयात दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय कैलासवासी भिमाजी आंबुजी शिंदे यांना त्यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक मान्यवरांनी स्तुतीसुमने उधळली तसेच गौरव उद्गार काढले..ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावा, त्याने उच्च शिक्षण घ्यावे या उद्देशाने आदरणीय कै. भिमाजी आंबूजी शिंदे यांनी आपली सुमारे 54 गुंठे जागा ही विद्यालयासाठी दान केली. असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष तसेच भीमाजी शिंदे यांचे नातू संदीप शिंदे यांनी केले .प्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी त्यांची धारणा होती व त्यांनी या पवित्र कामासाठी प्रथम पाऊल उचलले होते,असे प्रतिपादन रहीमपुर विद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास जाधव सर यांनी केले.आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे पवित्र असे काम या विद्यालयाच्या माध्यमातुन घडले यां...